राजा शिवाजी ची जोरदार घोडदौड; 50 कोटी पार करत टॉप-5 मध्ये एंट्री

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने आता 50 कोटींचा टप्पा पार केला असून मराठी चित्रपटांच्या टॉप-5 यादीत स्थान मिळवलं आहे.

1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीसोबत हिंदी भाषेतही रिलीज झालेल्या या सिनेमाने देशभरात आपली छाप पाडली आहे.

मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या दिवशी कमाईत थोडी घट दिसून आली. मंगळवारी मराठी व्हर्जनने सुमारे 3.35 कोटींची कमाई केली, जी सोमवारीच्या तुलनेत थोडी कमी होती. तरीही चित्रपटाची एकूण कमाई मजबूत राहिली आहे.

आतापर्यंत चित्रपटाने नेट कलेक्शनमध्ये सुमारे 44 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये मराठी व्हर्जनचा सर्वाधिक वाटा असून त्याने एकट्यानेच 30.5 कोटी रुपये कमावले आहेत.

दरम्यान, देशभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन 52.68 कोटींवर पोहोचले आहे. हिंदी व्हर्जनला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला होता, मात्र चांगल्या प्रतिक्रिया आणि word-of-mouth मुळे हिंदी प्रेक्षकांमध्येही चित्रपटाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

चित्रपटाच्या यशासोबतच आता त्याला महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणीही जोर धरत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

या चित्रपटात मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते. रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्याच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री आणि जिनिलिया देशमुख यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.

सध्या ‘राजा शिवाजी’ची कमाई आणि त्याचा वाढता प्रभाव पाहता, येत्या काही दिवसांत हा सिनेमा आणखी मोठे विक्रम करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page