प्रदर्शनानंतर १४ दिवस उलटूनही चित्रपटाची कमाई स्थिर असल्याचं दिसून येत आहे. sacnilk.com च्या माहितीनुसार, १४ मे रोजी चित्रपटाने भारतात १.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे, बुधवारीही चित्रपटाने इतकीच कमाई केली होती. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे.
पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात २४.३० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. अशाप्रकारे, बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ७६.९५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. येत्या विकेंडला चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
‘राजा शिवाजी’ हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र मराठी प्रेक्षकांकडून चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. मराठी व्हर्जनने १४ दिवसांत ५४.५५ कोटी रुपयांची कमाई केली, तर हिंदी व्हर्जनची कमाई २२.४० कोटी रुपये इतकी झाली आहे.
ऑक्युपन्सीच्या बाबतीतही मराठी शो आघाडीवर राहिले. सकाळच्या शोमध्ये ७.४३ टक्के उपस्थिती नोंदली गेली. दुपारच्या शोमध्ये १७ टक्के, तर संध्याकाळच्या शोमध्ये १६.७१ टक्के प्रेक्षक उपस्थित होते. मराठी शोची एकूण उपस्थिती १३.७१ टक्के राहिली.
दुसरीकडे, हिंदी व्हर्जनमध्ये सकाळच्या शोला ४.०८ टक्के उपस्थिती होती. दुपारच्या शोमध्ये १०.०८ टक्के आणि संध्याकाळच्या शोमध्ये १४ टक्के उपस्थिती नोंदली गेली. हिंदी शोची एकूण ऑक्युपन्सी १०.७० टक्के राहिली.
या चित्रपटात रितेश देशमुखसोबत जेनेलिया डिसूझा, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच सलमान खानचा खास कॅमिओही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
