रामचंद्र गांवकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३.६७ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. त्यामुळे २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘भूतम भयम’ सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाने ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’ला मागे टाकलं आहे.
कोईमोईच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही कमाई सुरू ठेवली आहे. तिसऱ्या वीकेंडला सिनेमाने सुमारे १० लाख रुपये कमावले. १९व्या दिवशीही चित्रपटाने जवळपास ३ लाख रुपयांचा गल्ला जमवला.
‘भूतम भयम’ची बॉक्स ऑफिसवर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’शी टक्कर झाली होती. मात्र, या स्पर्धेचा फार मोठा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झालेला दिसत नाही. प्रदर्शनानंतर २१ दिवस झाले असतानाही या सिनेमाचे शो काही ठिकाणी सुरू आहेत.
चित्रपटाचं बजेट सुमारे ४ कोटी रुपये असल्याचं कोईमोईच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन ३.६७ कोटी रुपये असून, नेट कलेक्शन सुमारे ३.२८ कोटी रुपये आहे. म्हणजेच आतापर्यंत चित्रपटाने आपल्या बजेटपैकी जवळपास ८१ टक्के रक्कम वसूल केली आहे.
२०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘राजा शिवाजी’ १०५.६८ कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘देऊळ बंद २’, ‘क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम’, ‘तंबाडची मंजुला’, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि ‘घबाडकुंड’ या चित्रपटांचा क्रमांक लागतो.
यानंतर ‘भूतम भयम’ ३.६७ कोटींच्या कमाईसह सातव्या स्थानावर आहे. त्याच्या मागे ‘सुपर डुपर’, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ आणि ‘तिघी’ हे चित्रपट आहेत.
‘भूतम भयम’ हा हॉरर-कॉमेडी थ्रिलर असून, चित्रपटात छाया कदम, करण सोनावणे आणि नील सालेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन रामचंद्र गांवकर यांनी केलं आहे.
आता उर्वरित दिवसांत ‘भूतम भयम’ ४ कोटींचं बजेट पूर्णपणे वसूल करून नफ्यात जातो का, याकडे मराठी चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
