छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे OTT प्लॅटफॉर्मचा वाढता प्रभाव असतानाही प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत.
तिसऱ्या गुरुवारी चित्रपटाने अंदाजे ८५ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता १०२.७० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.
पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ५२.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात २४.३० कोटी रुपयांची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची पकड कायम राहिल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.
तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने १.६० कोटी रुपये कमावले. शनिवारी ३ कोटी आणि रविवारी ३.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवारीही चित्रपटाने स्थिर कमाई कायम ठेवली.
चित्रपटाच्या कमाईचा हा वेग कायम राहिला तर चौथ्या विकेंडनंतर हा सिनेमा ११० ते ११५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याआधी ‘तान्हाजी’ आणि ‘छावा’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. त्यामुळे आता ‘राजा शिवाजी’ पुढे किती कमाई करणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
या चित्रपटात रितेश देशमुखसोबत जेनेलिया डिसूझा, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर आणि जितेंद्र जोशी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
