संकेत पाठक मालिका आणि ‘बिग बॉस’मधून प्रकाशझोतात आले आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे आणि ते काही महिन्यांपूर्वी बाबा झाले आहेत. ते सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्यांचे प्रत्येक व्हिडीओ लक्षात येतो.
व्हिडीओमध्ये ते चारचाकी चालवताना दिसतात. संतापलेल्या चेहऱ्याने ते बोलतात आणि एका राजकारण्याला ओपन चॅलेंज देतात. ते म्हणतात, ‘राजकारणात माणूस कुठल्याही लेव्हलला असला तरी तो, स्वार्थीच असतो. मी अशाच एका व्यक्तीबद्दल तुमच्याशी बोलतो आहे. कारण त्याने जे काही केलं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे’.
त्यांच्या भाषेत ते पुढे म्हणतात, ‘आजपर्यंत मी असं कुणाबद्दलही समोर येऊन काहीच बोललो नव्हतो. पण पाणी खरंच आता डोक्यावरून गेलं आहे. अशा व्यक्तीला आता चपलेने मारायची वेळ आली आहे. कारण याची हीच लायकी आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘या व्यक्तीचं नाव आणि त्याने काय केलं आहे, हे सर्वांना सांगणार आहे. कारण आता मला फरक पडत नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.’
व्हिडीओच्या शेवटी त्यांचा संताप अधिक वाढतो आणि ते म्हणतात, ‘आता याचा गेम मी चेंज करणार आहे’. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी विचारत आहेत, नेमकं प्रकरण काय आहे?
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
