कायदा अजून कसली वाट पाहतोय?, नसरापूर घटनेवर अंकिता वालावलकरची संतप्त पोस्ट
पुण्यातील नसरापूर प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने समाजमन हादरलं आहे. या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर हिनेही परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर स्पष्ट मतांसाठी ओळखली जाणारी अंकिता पुन्हा एकदा या गंभीर विषयावर आक्रमक झालेली दिसली. … Read more