एका मुलाखतीमध्ये मोहन जोशी यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या गंभीर आजाराबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, ‘धर्मवीर’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना अचानक पॅरालिसिस झाला होता.
“मला बोलताही येत नव्हतं आणि उभंही राहता येत नव्हतं,” असं त्यांनी सांगितलं. या काळात ‘देऊळ बंद २’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्यांच्यासाठी दीड-दोन वर्षे वाट पाहिली, असंही त्यांनी नमूद केलं.
मोहन जोशी म्हणाले की, त्या अवस्थेमुळे त्यांनी सिनेमासाठी दुसऱ्या अभिनेत्याला घेण्याचा सल्लाही दिला होता. मात्र प्रवीण तरडे यांनी त्यांना नकार देत चित्रपटासाठी थांबण्याचा निर्णय घेतला.
याबद्दल बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “मोहन जोशी आणि राघव शास्त्री नसतील तर प्रेक्षक नाराज होतील. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी थांबलो.”
मोहन जोशी यांनी पुढे सांगितलं की, आजारानंतर त्यांना चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. बोलण्यातही अडचणी येत होत्या. मात्र हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाली.
प्रवीण तरडे यांनीही त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं. “मोहन जोशींनी अभिनय जवळपास सोडला होता. पण त्यांनी पुन्हा सुरुवातीपासून तयारी केली. डायलॉगची प्रॅक्टिस केली,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, २०१५ मध्ये आलेल्या ‘देऊळ बंद’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘देऊळ बंद २’मध्ये मोहन जोशी पुन्हा स्वामींच्या भूमिकेत दिसत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
हा चित्रपट २१ मे रोजी प्रदर्शित झाला असून, सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
