सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्ये यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळला

Rohini Paradhye Solapur:सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एका लोकप्रिय रिलस्टारच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना समजल्यानंतर त्यांचे पती निलेश पाराध्ये यांनी तातडीने त्यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं.

या प्रकरणाची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर रील्समुळे चांगलेच लोकप्रिय झाले होते. सामाजिक विषय आणि खाद्यपदार्थांवरील व्हिडिओमुळे त्यांनी मोठा चाहतावर्ग तयार केला होता.

या दाम्पत्याने रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय सुरू केला होता. अल्पावधीतच या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळत होता. नवीन शाखा सुरू करण्याचं नियोजनही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

अशातच रोहिणी यांनी अचानक उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली असून, अनेकांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page