सैराटमधील सल्या आता झाला नवरा; अरबाज शेखच्या निकाहाची जोरदार चर्चा

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या सैराट चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख लग्नबंधनात अडकला आहे. अरबाजने त्याच्या गर्लफ्रेंड सिमरनसोबत निकाह केला असून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.

अरबाजने लग्नाचे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. चाहते, मित्रमंडळी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी कमेंट करत नवदांपत्याचे अभिनंदन केले.

या पोस्टवर अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही प्रतिक्रिया देत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि अभिनेता प्रतीक लाड यांनीही अरबाजचे अभिनंदन केले.

निकाह सोहळ्यात अरबाज आणि सिमरनचा साधा पण आकर्षक लूक पाहायला मिळाला. अरबाजने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर सिमरनने त्याच रंगाची सुंदर डिझायनर साडी नेसली होती. सिमरनचा साधा आणि मोहक लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.

मिनिमल मेकअप, पारंपरिक दागिने आणि केसात गजरा अशा लूकमध्ये सिमरन खूपच सुंदर दिसत होती. या दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली आहे.

अरबाजने फोटो शेअर करत छोटंसं कॅप्शन दिलं. त्यानंतर त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून अरबाज आणि सिमरन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. अखेर या दोघांनी नात्याला लग्नाची खूणगाठ बांधली.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अरबाज नुकताच नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या वेबसीरिजमध्ये झळकला होता. याशिवाय त्याने अनेक मराठी प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page