बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पण कलाकारांनी घेतले नाहीत पैसे; ‘राजा शिवाजी’बाबत मोठा खुलासा

अभिनेता रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही सिनेमाची दमदार कमाई सुरू आहे. मात्र आता या सिनेमाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

या चित्रपटातील काही मोठ्या कलाकारांनी कामासाठी एकही रुपया मानधन घेतले नाही, असा खुलासा खुद्द रितेश देशमुखने केला आहे. त्यामुळे सध्या मनोरंजन विश्वात या चर्चेला उधाण आलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना रितेशने सांगितले की, अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन, बोमन इराणी आणि जिनिलिया देशमुख यांनी या सिनेमासाठी कोणतेही मानधन घेतले नाही. या सर्व कलाकारांनी महाराजांच्या कथेसाठी आणि सिनेमाच्या भव्यतेसाठी योगदान दिले.

यामध्ये सलमान खानची विशेष भूमिका चर्चेत आहे. सिनेमात त्याचा स्क्रीन टाइम कमी असला तरी त्याने पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काम करत कोणतेही पैसे घेतले नाहीत. अभिषेक बच्चननेही महत्त्वाची भूमिका साकारत सिनेमाला साथ दिली.

विद्या बालनची भूमिकाही चित्रपटात लक्षवेधी असल्याचे सांगितले जात आहे. तर बोमन इराणी कमी वेळ दिसत असले तरी त्यांच्या भूमिकेला कथेत महत्त्व आहे. जिनिलिया आणि रितेश या प्रोजेक्टवर अनेक वर्षांपासून काम करत असल्याने त्यांनीही मानधन घेतले नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, रितेश देशमुखने स्वतःही मानधन घेतले नाही. कारण या सिनेमाची निर्मितीही त्यानेच केली आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी फक्त सिनेमा नसून भावनिकदृष्ट्याही खास असल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ची कामगिरीही चांगली दिसत आहे. चार दिवसांत चित्रपटाने 39 कोटींची कमाई केली असून लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठं बजेट, दमदार स्टारकास्ट आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी कथा यामुळे ‘राजा शिवाजी’ची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page