काही महिन्यांपूर्वी गायत्रीने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर तिच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ती उत्सुकता संपली असून गायत्री आणि श्रीकांत चवारे विवाहबंधनात अडकले आहेत.
अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील काही जवळचे मित्रही उपस्थित होते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या लग्नसोहळ्यातील खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गायत्री आपल्या नवऱ्याला हार घालताना दिसत असून दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो.
लग्नासाठी गायत्रीने गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. त्यासोबत पारंपरिक दागिने आणि हिरवा चुडा असा तिचा लूक खास आकर्षण ठरला. तर श्रीकांतने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान करत पारंपरिक अंदाजात हजेरी लावली. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
याआधी गायत्रीने ग्रहशांती विधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटोही चर्चेत आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती.
दरम्यान, गायत्रीची प्रेमकहाणीही तितकीच खास आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं होतं की, मित्र-मैत्रिणींच्या आग्रहामुळे तिने डेटिंग अॅप वापरण्यास सुरुवात केली. त्याच अॅपवर तिची श्रीकांतशी ओळख झाली. सुरुवातीला दोघे फक्त चॅट करत होते. हळूहळू संवाद वाढला आणि भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली.
यानंतर एका क्षणी गायत्रीला हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घ्यावा असं मनापासून वाटलं. तिनेच पुढाकार घेत घरी सांगण्याचा विषय काढला. विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबांकडून या नात्याला लगेच होकार मिळाला आणि पुढची वाट सहज झाली. अशा प्रकारे सुरू झालेली ही ओळख आता लग्नबंधनात रुपांतरित झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
