‘बिग बॉस OTT 2’ फेम पलक पुरसवानी अडकली विवाहबंधनात

Bigg Boss OTT 2 Fame Palak Purswani: ‘बिग बॉस OTT 2’मधून चर्चेत आलेली अभिनेत्री पलक पुरसवानी आता विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड रोहन खन्नासोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. या खास सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

पलक आणि रोहन यांचा विवाह तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील आदियोगी पुतळ्यासमोर पार पडला. ईशा योग केंद्रात झालेल्या या खास सोहळ्यात दोघांनी सात फेरे घेत एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतली. हा विवाह 26 जून 2026 रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला.

या लग्नसमारंभाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. पलकने या प्रसंगी बेज आणि लाल रंगाचा पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता, तर रोहनने शेरवानीची निवड केली होती. पारंपरिक लूक आणि हिरव्या रंगाच्या दागिन्यांमुळे पलकचा अंदाज विशेष उठून दिसत होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांचे आनंदी आणि रोमँटिक क्षण पाहायला मिळतात. एका छायाचित्रात ते हातात हात घालून हसताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये रोहन पलकच्या कपाळात सिंदूर भरताना आणि तिला मंगळसूत्र घालताना दिसतो.

या फोटोंसोबत पलकने एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. “काही प्रेमकथा नियतीने लिहिलेल्या असतात, आमची निवड महादेवाने केली; From two souls, to one forever… 26.06.26,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पलकच्या या पोस्टवर चाहते, मित्र आणि अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पलक पुरसवानीने ‘बडी देवरानी’, ‘ये रिश्ते हैं प्यार के’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस OTT 2’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला 7’ या रिअॅलिटी शोमुळेही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page