हे सगळं झालं ते एका धाडसी डावामुळे. तिसऱ्या वीकेंडला शानदार कमाई केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी सिनेमाची गती मंदावली होती. लगेच निर्मात्यांनी तिकिटांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला.
आता हा सिनेमा ९९ रुपयांमध्ये पाहता येतो. तिकिटांच्या किमतींमध्ये ८० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याचा फायदा तिसऱ्या मंगळवारी झाला आणि कमाईत पुन्हा तेजी आली.
तिसऱ्या मंगळवारी, म्हणजे रिलीजच्या २०व्या दिवशी, ‘रामायण’ने १७.५० कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार हा आकडा समोर आला आहे.
या कमाईमुळे तो तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कलेक्शन करणारा पहिला चित्रपट बनला. त्याने धुरंधरचे १७.२५ कोटी, पुष्पा २चे ११.५० कोटी, केजीएफ २चे ९.५७ कोटी, धुरंधर २चे ९.५० कोटी आणि बाहुबली २चे ६.९५ कोटींचे कलेक्शन मागे टाकले.
आधी या सिनेमाने तिसऱ्या सोमवारी, म्हणजे रिलीजच्या १९व्या दिवशी, आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केले होते. तो फक्त १२.७० कोटीच कमावू शकला होता.
भारतातील २० दिवसांची नेट कमाई आता ९७२.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या काळात हिंदीत १४.२५ कोटी, मल्याळममध्ये १.२५ कोटी, कन्नडमध्ये ९० लाख, तामिळमध्ये ७० लाख आणि तेलुगूमध्ये ४० लाख रुपयांची कमाई झाली.
आता सिनेमा १ हजार कोटीच्या टप्प्याकडे झपाट्याने वाटचाल करत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि साई पल्लवी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
पुढच्या दिवसांत हा आकडा १ हजार कोटींकडे वाढतो का, हे बघणं बाकी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
