100 हून अधिक चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू, चाहते हळहळले

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मल्याळम अभिनेते संतोष के. नायर यांचे निधन झाले आहे. केरळमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात हा अपघात झाला. आदूरजवळील पीथुसेरी परिसरात एमसी रोडवर संतोष यांच्या कारची ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, डॉक्टरांनी संतोष यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर त्यांच्या पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या संतोष के. नायर यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी नायक, खलनायक आणि विनोदी अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

संतोष यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1980 च्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यानंतर अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले.

त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सहकारी कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page