सध्या रितेश ‘लॉक अप 2’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. शोमधील एका भागात स्पर्धक योगेश रावत याच्याशी संवाद साधताना त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभव शेअर केला.
रितेश म्हणाले की, त्यांनी पहिला चित्रपट केला तेव्हा त्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे अनेक जण ‘मुख्यमंत्र्यांचा मुलगा’ असल्यामुळेच त्यांना चित्रपट मिळतात आणि ते यशस्वी होतात, असे बोलत होते. मात्र त्या काळातही त्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवला.
योगेश रावतला समजावताना रितेश म्हणाले की, लोक अनेकदा संपूर्ण सत्य न जाणता मत तयार करतात. बाहेरून जे दिसते, त्यावरूनच अनेकजण निष्कर्ष काढतात. त्यामुळे अशा टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, 23 वर्षे आणि जवळपास 60 चित्रपटांनंतर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही शिक्के पुसण्यासाठी वेळ आणि सातत्यपूर्ण मेहनत लागते. मात्र दृढनिश्चय असेल तर अशी ओळख बदलता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रितेश देशमुख यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘हे बेबी’, ‘मस्ती’, ‘लय भारी’, ‘वेड’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
