‘अबीर’चा टिझर धमाकेदार; १८ डिसेंबरला येत आहे हा पंढरीच्या विठ्ठलाची गोष्ट सांगणारा चित्रपट

Abeer Movie Marathi Teaser: मराठी प्रेक्षकांसाठी एक नवा ग्रामीण चित्रपट आता सज्ज झाला आहे. ‘अबीर’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट येत्या १८ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

गावाकडचे जीवन, नात्यांमधील भावबंध आणि सामाजिक वास्तव यांची सांगड घालणारा हा सिनेमा आहे. संगीत, नृत्य आणि मनोरंजनाची मेजवानी देतानाच भावनिक आशयही या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

टिझरमध्ये निसर्गरम्य ग्रामीण परिसर, शांतपणे वाहणारी नदी आणि नारळी-पोफळीच्या बागांचे मनोहारी दर्शन घडते. नदीच्या काठावरून सुरू होणारा प्रवास, नावेतून होणारी सफर आणि गावातील माणसांची वर्दळ यातून एका ग्रामीण विश्वाची हळुवार उकल होते.

मात्र या सुंदर वातावरणामागे भावनिक संघर्ष आणि नाट्यमय घडामोडींचीही झलक टिझरमध्ये दिसते. पंढरीचा विठ्ठल आणि जीवनात येणारी संकटे यांची सुरेख सांगड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

निर्माते सुदेश झावरे पाटील यांच्या शब्दांत, ‘अबीर’ हा केवळ चित्रपट नसून माणसाच्या अंतर्मनातील सौंदर्य, श्रद्धा आणि माणुसकीचा शोध घेणारा भावप्रवास आहे. पंढरीच्या विठुरायाच्या चरणी लीन होणारा वारकरी संप्रदाय समतेचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा संदेश देतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

वर्णभेदाच्या पलीकडे जाऊन माणसातील संस्कार आणि अंतःसौंदर्य ओळखण्याचा हा संदेश आहे. ग्रामीण भागातील रसिकांपासून वारकरी बांधवांपर्यंत हा विचार सर्वांच्या मनाला भावेल, असा त्यांना विश्वास आहे.

दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे यांच्या मते, ‘अबीर’ ही केवळ एका गावाची किंवा काही माणसांची गोष्ट नाही. माणसांच्या मनात दडलेल्या भावभावनांचा आणि नात्यांच्या विविध रंगांचा हा प्रवास आहे.

ग्रामीण मातीचा सुगंध, तिथली संस्कृती आणि श्रद्धा यांचे प्रामाणिक चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. टिझरमध्ये चित्रपटाच्या विश्वाची केवळ एक झलक दाखवली असून, कथानकातील अनपेक्षित वळणे प्रेक्षकांना सिनेमात अनुभवायला मिळतील, असे ते सांगतात.

चित्रपटाची निर्मिती सुदेश झावरे पाटील यांनी केली असून शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी त्याची प्रस्तुती केली आहे. लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन यांची जबाबदारी आकाश विष्णू शिंदे यांनी सांभाळली आहे.

चित्रपटात पायल जाधव आणि निखिल चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासोबत देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर आणि गार्गी फुले यांचाही चित्रपटात समावेश आहे.

यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे आणि साईराज केंद्रे याही भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही विशेष भूमिका साकारली आहे.

छायांकन निशांत भागवत यांनी केले असून अमित खंडागळे आणि सचिन नागरे यांनी सहदिग्दर्शन सांभाळले आहे. संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांच्याकडे आहे.

संगीत आणि पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि राधा खुडे यांनी गाण्यांना स्वर दिले आहेत. चित्रपटातील गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

रंगभूषा सुजित सुरवसे, वेशभूषा स्नेहल नार्वेकर आणि कला दिग्दर्शन महेश गोरे यांचे असून ध्वनी संयोजन विकास खंदारे आणि ध्वनी संकलन स्वरूप जोशी यांनी केले आहे. विष्णू घोरपडे यांनी प्रॉडक्शन सांभाळले असून मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत. अभय वाव्हळ आणि युवराज कुमार इंगवले प्रोजेक्ट हेड तर प्रतिभा चव्हाण लाईन प्रॉड्युसर आहेत.

आता प्रेक्षकांच्या वाट पाहत असलेल्या या चित्रपटाला १८ डिसेंबरपासून चित्रपटगृहांत भेटता येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page