रुपाली भोसले म्हणाली, “स्वामींची कृपा म्हणूनच वाचले” — अपघाताचा थरारक प्रसंग उघड केला

Marathi Entertainment News - Rang Marathi

Rupali Bhosale: लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले अलीकडेच एका अपघातातून थोडक्यात बचावली. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत साकारलेल्या संजनाच्या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेत झळकतेय. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी रुपाली काही दिवसांपूर्वी तिच्या गाडीच्या अपघाताचा फोटो शेअर करताना दिसली होती. या अपघाताविषयी रुपालीनं नुकतीच ‘मराठी मनोरंजनविश्व’ या … Read more

‘बिग बॉस १९’मध्ये एंट्री घेताच चर्चेत मालती चहर; उघड केला कठोर बालपणाचा किस्सा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Bigg Boss 19 Malti Chahar: ‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर मालती चहर सध्या चर्चेचा विषय बनली आहे. घरात प्रवेश करताच तिच्या उपस्थितीमुळे सर्व समीकरणं बदलली आहेत. काही स्पर्धकांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर काहींमध्ये नव्या मैत्रीचं नातं जोडताना दिसत आहे. मालती ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची मोठी बहीण असून ती मॉडेल आणि अभिनेत्री … Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही कबुतरखान्यांवर वाद; विद्याधर जोशी म्हणाले “हे सगळ्यांसाठी घातक”

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Vidyadhar Joshi: दादरच्या कबुतरखान्याच्या वादावरून काही महिन्यांपूर्वी मोठं राजकारण पेटलं होतं. सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्ट दोघांनीही कबुतरखान्यांवर बंदी घातली होती. या प्रकरणावर अनेकांनी मतप्रदर्शन केलं आणि आता प्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप मराठी’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशींनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर थेट भाष्य केलं. … Read more

गौतमी पाटीलच्या नृत्याने ‘सोनचाफा’ गाणं गाजवलं; रील्सवर तुफान व्हायरल

Marathi Entertainment News - Rang Marathi

गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं नवं गाणं ‘सोनचाफा’ सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजतंय. ‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या ओळींनी सजलेलं हे गाणं चाहत्यांना अक्षरशः थिरकायला भाग पाडत आहे. गौतमीच्या मोहक अदा आणि तिच्या नृत्यशैलीने या गाण्याला वेगळंच आकर्षण मिळालं. नवरात्रोत्सवाच्या काळात ‘सोनचाफा’ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी गौतमीच्या डान्सवर लोकांनी … Read more

वडिलांच्या निधनानंतर हर्षदा खानविलकरचा भावनिक खुलासा; म्हणाली, “तोच आहे माझ्या बुढाप्याचा सहारा”

Marathi Entertainment News - Rang Marathi -

अभिनेत्री हर्षदा खानविलकर मराठी मालिकांमधील एक ओळखीचं नाव आहे. अनेक मालिकांमधील दमदार भूमिकांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या ती झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवासी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच झी मराठीने ‘उत्सव नात्यांचा’ हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात वेगवेगळ्या मालिकांतील कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. त्यात हर्षदालाही पारितोषिक … Read more

‘मना’चे श्लोक या मराठी सिनेमाच्या शीर्षकाला विरोध, नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा; काय आहे नेमका वाद?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

गेल्या काही वर्षात सिनेमा आणि वाद … हे समीकरण वाढताना दिसतंय. सिनेमाचं नाव, कलाकारांच्या कपड्यांचा रंग, गाणी…या सगळ्यावर वेगवेगळ्या कारणांमुळं आक्षेप घेतला गेल्याचं पाहायला मिळालं. धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत अनेक सिनेमांवर बंदी घालण्याचे प्रकारही समोर आले. आता एका आगामी मराठी सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या ‘मना’चे श्लोक ’ या सिनेमाचं शीर्षक बदलण्याची … Read more

सतीश राजवाडेंचा ‘प्रेमाची गोष्ट २’ ट्रेलर चर्चेत; ललित-ऋचा-रिधिमाची अनोखी केमिस्ट्री

Marathi Entertainment News - Rang Marathi -

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आधीच टिझर आणि गाणी चर्चेत असताना, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी ‘ओल्या सांजवेळी २.०’ आणि ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर नृत्य सादर करत रंगत आणली. ट्रेलरमध्ये ललितच्या … Read more

“उर्दू माझी सवत आहे जी बायकोलाही आवडते” — सचिन पिळगांवकरांचं वक्तव्य व्हायरल

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच ‘बहार ए उर्दू’ या कार्यक्रमात त्यांनी उर्दू भाषेविषयी केलेलं विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. सचिन म्हणाले, “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतूनच करतो. माझी पत्नी किंवा कोणीही रात्री तीन वाजता उठवलं, तरी मी उर्दूतच बोलतो. मी … Read more

‘पायी फुफाटा’च्या यशानंतर ‘तू धाव रे’ने रंगवली प्रेरणेची नवी धून

Marathi Entertainment News - Rang Marathi -

पायी फुफाटा’ या गाण्याच्या प्रचंड यशानंतर गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंटने प्रेक्षकांसाठी नवं प्रेरणादायी गीत ‘तू धाव रे’ सादर केलं आहे. या गाण्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत असून तरुणांमध्ये नव्या जोमाने उत्साह निर्माण होत आहे. हे गाणं एका छोट्या गावातील तरुणाची कहाणी सांगतं — जो संकटांशी झुंज देत, छोट्या-मोठ्या कामांमधून आपल्या स्वप्नांना गाठतो. त्याच्या संघर्षातून मिळालेलं … Read more

सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन विवाहबंधनात; सोशल मीडियावर दिली खुशखबर

Marathi Entertainment News - Rang Marathi

लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि कॉमेडियन सारंग साठ्ये लग्नबंधनात अडकला आहे. त्याची जोडीदार पॉला मॅकग्लिनसोबत त्याने साध्या पद्धतीने विवाह केला. अनेक वर्षांच्या नात्याला त्यांनी अखेर अधिकृत स्वरूप दिलं. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. “हो, आम्ही लग्न केले आहे. लग्न आमच्यासाठी कधी प्राधान्याचं नव्हतं, पण मागचं वर्ष कठीण गेलं. जगभर वाढणारा द्वेष … Read more

You cannot copy content of this page