धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; व्हेंटिलेटरवर उपचार, चाहत्यांच्या प्रार्थना सुरू

Marathi Entertainment News - Rang Marathi

Actor Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या प्रकृती अस्वस्थ असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानं त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. 31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट … Read more

बॉलिवूडमध्ये खुशखबर! कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या घरी चिमुकल्याचं आगमन

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Katrina Kaif and Vicky Kaushal Welcome Baby Boy: बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या घरी गोड बातमी आली आहे. वयाच्या ४२व्या वर्षी कतरिनानं मुलाला जन्म दिला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. “आमच्या आनंदाचं आगमन झालंय. अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय,” असं विक्कीनं … Read more

रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या ‘उत्तर’चा टीझर आला समोर; आई-मुलाच्या नात्यावर भाष्य

Marathi Entertainment News - Rang Marathi

Uttar Movie Teaser: आई आणि मुलाच्या नात्याचं मर्म सांगणाऱ्या ‘उत्तर’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. “आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं,” या भावनेवर आधारित ही कहाणी आजच्या काळातील आई-मुलाच्या नात्याला नवी दिशा देणारी ठरेल, असं टिझर पाहून जाणवतं. झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाद्वारे क्षितिज पटवर्धन दिग्दर्शनात … Read more

राज ठाकरेंनी पाहिला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’, फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली संतापाची भावना

Marathi Entertainment News - Rang Marathi -

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. प्रदर्शना नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सिनेमा पाहिला आणि फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून आपलं मत व्यक्त केलं. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर थेट भाष्य केलं … Read more

प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही प्रणित मोरे घराबाहेर; काय आहे खरं कारण?

Marathi Entertainment News - Rang Marathi

Pranit More: ‘बिग बॉस 19’मधून एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. चर्चेत असलेला स्पर्धक प्रणित मोरे आता घराबाहेर गेला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच प्रणितने कॅप्टन्सी जिंकली होती, पण आनंदाचा हा क्षण जास्त काळ टिकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित तब्येतीच्या कारणास्तव बाहेर गेला असल्याचं बोललं जात आहे. काही सोशल मीडिया पेजवर तर त्याला … Read more

अभिनेता अजिंक्य राऊत साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; चाहत्यांमध्ये उत्सुकता

Marathi Entertainment News - Rang Marathi

Ajinkya Raut: ‘मन उडू उडू झालंय’ या चर्चित मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता अजिंक्य राऊत आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या सिनेमातून अजिंक्य प्रेक्षकांसमोर एका अत्यंत जबाबदारीच्या भूमिकेत दिसणार आहे. छोट्या पडद्यावरून घराघरात पोहचलेल्या अजिंक्यनं आतापर्यंत विविध मालिका आणि … Read more

‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ची धूम! निलेश साबळेचा दमदार कमबॅक

Marathi Entertainment News - Rang Marathi

चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता आणि लेखक डॉ. निलेश साबळे पुन्हा नव्या रूपात येण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षे कॉमेडी आणि उत्तम लिहिण्यामुळे त्याने खास ओळख निर्माण केली. मात्र शोचा दुसरा सीझन सुरू झाला तेव्हा कामाच्या व्यापामुळे तो त्यात दिसला नाही. काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘ढिंच्याक दिवाळी’मध्ये तो … Read more

मालिकेवरच प्रेम, लग्न आणि आता घटस्फोट? योगिता-सौरभच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Marathi Entertainment News - Rang Marathi

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेच्या सेटवर जवळ आलेली ही जोडी 3 मार्च 2024 रोजी विवाहबंधनात अडकली होती. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या जोरात आहेत. या चर्चेला उधाण येण्याचं कारण म्हणजे दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांचे लग्नातील आणि रोमँटिक फोटो डिलिट … Read more

दशावतार मराठी चित्रपट आता मल्याळममध्ये! बाबुली मेस्त्रीचा जलवा साऊथमध्ये

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी चित्रपट ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट यंदा सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये मोडकळीस उभा राहिला आहे. विशेष म्हणजे जेष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांचा मत्स्य अवतार इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. कोकणातील दशावतारावर आधारित असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातही चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजूनही … Read more

मोठं नाव नसतानाही दिली अमर कामगिरी — सतिश शाह यांच्या प्रवासाचा आढावा

Marathi Entertainment News - Rang Marathi -

सिनेविश्वात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सतिश शाह आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सीन छोटा असो किंवा मोठा — प्रेक्षकांना हसवण्याची आणि भावनांनी जोडून ठेवण्याची ताकद सतिश शाह यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केली. २५ जून १९५१ रोजी मुंबईत एका गुजराती … Read more

You cannot copy content of this page