‘राजा शिवाजी’च्या विक्रमी यशानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष होते. ३१ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकर प्रमुख भूमिकेत आहेत. मित्रांच्या गोवा ट्रिपवर आधारित ही कथा विनोद, मैत्री आणि मनोरंजक प्रसंगांनी भरलेली असल्याने प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
फिल्मीविलाच्या अहवालानुसार, चित्रपटाचं अंदाजित बजेट ७ कोटी रुपये आहे. सुरुवातीच्या कमाईवरून हा चित्रपट अपेक्षेनुसार व्यवसाय करत असल्याचं दिसून येत आहे.
कोइमोईच्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटाने ४१ लाख रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी शनिवारी २३ लाख रुपयांची कमाई झाली होती, तर पहिल्या दिवशी चित्रपटाने ८ लाख रुपयांचा गल्ला जमवला होता.
या कमाईसह ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’च्या ६४ लाख रुपयांच्या ओपनिंग वीकेंड कमाईला मागे टाकलं आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनच्या यादीत हा चित्रपट नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
चित्रपटाचं तीन दिवसांचं नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ७२ लाख रुपये इतकं झालं आहे. तर ग्रॉस ओपनिंग वीकेंड कलेक्शन ८४ लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
२०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कलेक्शन करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘राजा शिवाजी’ ३७ कोटी रुपयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ‘देऊळ बंद २’ (१५.७५ कोटी), ‘तुंबाडची मंजुला’ (३.२५ कोटी), ‘घबाडकुंड’ (२.४३ कोटी), ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ (२.२ कोटी), ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ (१.८ कोटी), ‘भूतम् भयम्’ (१.४८ कोटी), ‘सुपर डुपर’ (८५ लाख), ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ (७२ लाख) आणि ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’ (६४ लाख) यांचा समावेश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
