तन्वीने सांगितले की, बिग बॉसच्या घरात असताना ती अनेकदा तिच्या वडिलांची आठवण काढायची. इतर स्पर्धकांशी बोलताना आणि विविध प्रसंगांमध्ये ती वारंवार, “पप्पा असते तर…” असे म्हणायची. हा संपूर्ण प्रवास बिग बॉसने पाहिला होता.
तिच्या मते, जर्नी व्हिडिओ दाखवताना बिग बॉसने तिला भावनिक संदेश दिला. “यापुढे कोणीही विचारलं, तर तुला वडील आहेत आणि त्यांचं नाव बिग बॉस आहे,” असे शब्द ऐकून ती भारावून गेली होती.
याबद्दल बोलताना तन्वी म्हणाली की, त्या क्षणी तिला कोणीतरी वडिलांचं स्थान देत असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे शो संपल्यानंतर तो क्षण विसरणं तिला योग्य वाटलं नाही. याच कारणामुळे तिने आपल्या नावात **’बिग बॉस’**चा उल्लेख जोडण्याचा निर्णय घेतला.
तन्वीने पुढे सांगितले की, तिने काही जणांना भाऊ मानलं आहे, तसेच बिग बॉसलाही आपल्या आयुष्यात विशेष स्थान दिलं आहे. शोदरम्यान दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठीच तिने हा निर्णय घेतला.
तिने हेही स्पष्ट केलं की, ‘बिग बॉस मराठी’मुळेच तिला खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली. “आज लोक मला ज्या स्वरूपात ओळखतात, ते बिग बॉसमुळेच शक्य झालं. माझं खरं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांपर्यंत या शोमधून पोहोचलं,” असं ती म्हणाली.
नाव बदलण्याच्या निर्णयावर काहीजण टीका करत असल्याचंही तिने मान्य केलं. मात्र, “लोकांना हा निर्णय शो ऑफ वाटू शकतो, पण मी माझ्या निर्णयामुळे खूप आनंदी आहे,” असे सांगत तिने आपल्या भूमिकेचं समर्थन केलं.
तन्वी कोलतेने हा खुलासा ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केला असून, तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
