Bigg Boss 20: ‘तथास-TWO!’ नव्या ट्विस्टसह प्रीमियर डेट जाहीर; प्रोमो व्हायरल

Bigg Boss 20 Officially Announced: ‘बिग बॉस 20’ची चाहत्यांमध्ये सुरू असलेली उत्सुकता अखेर संपली आहे. निर्मात्यांनी शोचा पहिला प्रोमो रिलीज करत नव्या पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे. यासोबतच शोच्या प्रीमियरची तारीखही जाहीर करण्यात आली असून, यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

यंदाही अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जिओहॉटस्टार आणि कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान घोड्यावरून दमदार एन्ट्री करताना दिसतो. यावेळी तो ‘करण-अर्जुन’ चित्रपटाचा संदर्भ देत, “जे तिथे घडलं, तेच आता बिग बॉसमध्येही घडणार,” असा संवाद म्हणताना दिसतो. त्यामुळे नव्या सीझनबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

प्रोमोसोबत शेअर करण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये “एकापेक्षा दोघे बरे!” असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निर्मात्यांच्या माहितीनुसार, यंदाचा संपूर्ण सीझन एका मोठ्या रहस्याभोवती फिरणार आहे. प्रत्येक भागात या रहस्याचे नवे पैलू उलगडत जाणार असून, याआधीच्या कोणत्याही पर्वात असा ट्विस्ट पाहायला मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

नव्या सीझनबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला की, प्रोमोमध्ये पहिला संकेत आधीच देण्यात आला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर प्रोमो पुन्हा पाहावा लागेल. सीझन सुरू झाल्यानंतर हे सर्व संकेत एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, हे प्रेक्षकांना समजेल.

‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार असून, हा शो जिओहॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे. त्याचबरोबर तो कलर्स टीव्हीवरही प्रसारित होईल. अद्याप स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

मागील पर्वात गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’ची ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आणि नव्या ट्विस्टमागचे रहस्य काय असेल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page