1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीसोबत हिंदी भाषेतही रिलीज झालेल्या या सिनेमाने देशभरात आपली छाप पाडली आहे.
मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या दिवशी कमाईत थोडी घट दिसून आली. मंगळवारी मराठी व्हर्जनने सुमारे 3.35 कोटींची कमाई केली, जी सोमवारीच्या तुलनेत थोडी कमी होती. तरीही चित्रपटाची एकूण कमाई मजबूत राहिली आहे.
आतापर्यंत चित्रपटाने नेट कलेक्शनमध्ये सुमारे 44 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये मराठी व्हर्जनचा सर्वाधिक वाटा असून त्याने एकट्यानेच 30.5 कोटी रुपये कमावले आहेत.
दरम्यान, देशभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन 52.68 कोटींवर पोहोचले आहे. हिंदी व्हर्जनला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला होता, मात्र चांगल्या प्रतिक्रिया आणि word-of-mouth मुळे हिंदी प्रेक्षकांमध्येही चित्रपटाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.
चित्रपटाच्या यशासोबतच आता त्याला महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणीही जोर धरत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
या चित्रपटात मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते. रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्याच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री आणि जिनिलिया देशमुख यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.
सध्या ‘राजा शिवाजी’ची कमाई आणि त्याचा वाढता प्रभाव पाहता, येत्या काही दिवसांत हा सिनेमा आणखी मोठे विक्रम करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
