Sunita Ahuja: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. काही काळापूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र त्यांनी गणपतीचा सण एकत्र साजरा करत त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तरीही, दोघांनी नंतर केलेल्या वक्तव्यांमुळं हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
गोविंदाचं एका तरुण मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. या चर्चांवर अखेर सुनीता आहूजा हिनं प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस १३’ फेम पारस छाबडा यांच्या ‘अबरा का डाबरा’ या पॉडकास्टमध्ये सुनीता सहभागी झाली होती. यावेळी तिनं स्पष्ट सांगितलं, “मी ऐकलं आहे की ती मराठी अभिनेत्री आहे. पण जोपर्यंत मी स्वतः पाहत नाही किंवा रंगेहात पकडत नाही, तोपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही.”
सुनीतानं या मुलाखतीत केवळ या चर्चांवरच नाही, तर स्वतःच्या आयुष्यावर आणि स्वावलंबनावरही खुलं बोललं. “मी व्लॉगिंग सुरू केल्याच्या चार महिन्यांत YouTubeचं सिल्व्हर बटन मिळवलं. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. पती पैसे देतो, पण दहा वेळा मागितल्यानंतर एकदा देतो. स्वतः पैसे कमावल्यावर वेगळाच आनंद मिळतो,” असं ती म्हणाली.
यावेळी सुनीतानं गोविंदावर अप्रत्यक्ष टोला मारत म्हटलं, “तो आता या सगळ्या गोष्टींपेक्षा मुलांच्या करिअरकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.”
तिच्या या वक्तव्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यावरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
