गेल्या काही वर्षात सिनेमा आणि वाद … हे समीकरण वाढताना दिसतंय. सिनेमाचं नाव, कलाकारांच्या कपड्यांचा रंग, गाणी…या सगळ्यावर वेगवेगळ्या कारणांमुळं आक्षेप घेतला गेल्याचं पाहायला मिळालं. धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत अनेक सिनेमांवर बंदी घालण्याचे प्रकारही समोर आले. आता एका आगामी मराठी सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी होत आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या ‘मना’चे श्लोक ’ या सिनेमाचं शीर्षक बदलण्याची मागणी आता होताना दिसतेय. श्री समर्थ सेवा मंडळ , सज्जन गड यांनी या सिनेमाच्या ‘मना’चे श्लोक ’ या नावाला विरोध केला आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर सिनेमासाठी केल्यानं त्यांची नाराजी आहे.पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर, मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टींसाठी नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटाचं नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जन गड यांच्या वतीनं देण्यात आला आहे.
या वादावर सिनेमाची टीम किंवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये.
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडेचे वैयक्तिक किस्से आणि मजा मस्ती
दरम्यान, ‘मना’चे श्लोक ’ हा कौटुंबिक तसंच नाते संबंधांवर आधारित सिनेमा आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आल्यापासूनच सिनेमाची चर्चा सुरू होती. मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार आहे.चित्रपटात मृण्मयी आणि राहुलसोबत पुष्कराज चिरपुटकर , सुव्रत जोशी , सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकारही झळकणार आहेत.
या चित्रपटाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली की,’मना’चे श्लोक मधली ही गोष्ट आहे मनवा आणि श्लोक या दोघांची आहे. त्यांच्या नात्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या असण्यातून, त्यांची आयुष्याबद्दलची मतं, वेगवेगळे विचार हे सगळ्यांना ओळखीचे वाटतील.
आज काला लग्नासारख्या विषयावर प्रत्येकाचं काही ना काही मत असतं. कुणाचं ठाम, कुणाचं गोंधळलेलं. या गोष्टी अनेकांनी अनुभवलेल्या असतील , तर कोणाच्या वाटाल्याला ते अनुभव येणार असतील. मी आताच सांगणार नाही की, चित्रपट कोणत्या वळणावर जाईल, पण मला खात्री आहे की प्रेक्षकम्हणतील, ‘हे तर अगदी माझ्यासारखं आहे!’ म्हणूनच हे ‘मना’चे श्लोक म्हणजे तुमच्याच मनातले विचार आहेत.’
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
