राज्य सरकारने १ मेपासून चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. नियम पाळला नाही तर परवाना रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयाला काही रिक्षाचालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी ४ मेपासून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे हा विषय अधिकच तापला आहे.
दरम्यान, या वादावर मराठी कलाकारही आपली भूमिका मांडत आहेत. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी यापूर्वीच स्पष्ट मत व्यक्त केले होते. आता गायक उत्कर्ष शिंदे यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये मराठी भाषेबद्दल भावना व्यक्त करत ठाम शब्दांत भूमिका मांडली. “मराठी येत नसेल तर शिका, आणि शिकायचीच नसेल तर निघा,” असे त्यांनी लिहिले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून मराठी भाषेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. “आम्हाला कोणाचा द्वेष नाही, पण मराठीचा मान आणि अभिमान जपणं गरजेचं आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
सध्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
