चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता आणि लेखक डॉ. निलेश साबळे पुन्हा नव्या रूपात येण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षे कॉमेडी आणि उत्तम लिहिण्यामुळे त्याने खास ओळख निर्माण केली. मात्र शोचा दुसरा सीझन सुरू झाला तेव्हा कामाच्या व्यापामुळे तो त्यात दिसला नाही.
काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘ढिंच्याक दिवाळी’मध्ये तो अचानक झळकला आणि त्यानंतरच त्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा सुरू झाली. भाऊ कदम आणि निलेश पुन्हा जोडीने दिसणार का, याबद्दलही अनेकांनी अंदाज लावले.
आता निलेश साबळेने सोशल मीडियावरून अधिकृत घोषणा केली आहे. त्याचा नवा कार्यक्रम ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या नावाने लवकरच सुरु होणार असून हा शो खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत आणि बक्षिसे अशा फॉरमॅटमध्ये असणार आहे. सहभागींसाठी संपर्क क्रमांकही त्याने दिला आहे. मात्र हा शो कोणत्या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार याचा खुलासा अजून केलेला नाही.
या नावावरून हा कार्यक्रम झी मराठीच्या लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’सारखाच असू शकतो, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. आदेश बांदेकर यांच्यासारखाच हा शो थेट गृहिणींशी संवाद साधणारा असू शकतो, असंही बोललं जात आहे. निलेशच्या पोस्टखाली अनेक महिलांनी उत्साह व्यक्त केला असून मोठ्या संख्येने कमेंट्स येत आहेत.
यामध्ये भाऊ कदमही असेल का, याबद्दल मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. प्रेक्षकांकडून या नव्या शोबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
