८१६ कोटी कमावणारा Kantara Chapter 1 अचानक ओटीटीवर — कारण ऐकून चाहत्यांनाही धक्का

Kantara Chapter 1: कांतारा: चॅप्टर वन’ या चित्रपटानं प्रदर्शनाानंतर तब्बल महिना उलटूनही थिएटरमध्ये अजूनही हाऊसफुल्ल शो अनुभवले जात आहेत. तरीही हा सिनेमा थेट ओटीटीवर लवकर आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याने चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. इतक्या जबरदस्त चालणाऱ्या चित्रपटाचा ओटीटीवर इतक्या लवकर प्रवेश का?

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटानं आतापर्यंत ८१६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विकी कौशलच्या ‘छावा’लाही मागे टाकत तो २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झाला होता आणि आता ३१ ऑक्टोबरला प्राईम व्हिडिओवर ओटीटीवर उपलब्ध होणार आहे.

खरं कारण स्पष्ट करताना चित्रपटाचे सह-निर्माते चेलुवे गौडा म्हणाले की, “हा निर्णय प्रत्यक्षात तीन वर्षांपूर्वी झालेल्या कराराचा भाग आहे. त्यावेळी रिलीज विंडोची पद्धत वेगळी होती. त्यामुळे आम्ही हा करार पूर्ण करत आहोत.”

सध्या फक्त दक्षिण भारतीय भाषांमधल्या आवृत्त्या ओटीटीवर येतील. हिंदी आवृत्ती आठ आठवड्यांनंतर उपलब्ध केली जाईल. कोविडनंतर इंडस्ट्रीत मोठ्या चित्रपटांसाठी ओटीटी गॅप केवळ चार आठवडे झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

कांतारा अजूनही गर्दी खेचत असतानाच ओटीटीवर येणं हा निर्णय व्यवसायिक करारानुसार असल्याचं स्पष्ट करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आता थेट डिजिटल रिलीजकडे वळली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page