Emraan Hashmi: ‘सिरीयल किसर’ हा टॅग मिळवलेला अभिनेता इम्रान हाश्मी आता ‘हक’ या चित्रपटातून पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. १९८५ सालच्या शाह बानो प्रकरणावर आधारित हा चित्रपट असून अभिनेत्री यामी गौतम शाह बानोची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या — काहींनी चित्रपटाचं कौतुक केलं तर काहींनी मुस्लिम समाजाचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप केला.
याच पार्श्वभूमीवर ANI शी बोलताना इम्रान हाश्मी म्हणाला, “मी परवीन नावाच्या हिंदू महिलेशी लग्न केलं आहे. माझ्या कुटुंबात माझा मुलगा पूजाही करतो आणि नमाजही पठण करतो. हेच आमचं धर्मनिरपेक्ष संस्कार आहेत. त्यामुळे मी ‘हक’ या चित्रपटाकडे वेगळ्या नजरेतून पाहतो.”
तो पुढे म्हणाला, “प्रत्येकजण आपल्या धार्मिक श्रद्धा आणि संस्कारांनुसार चित्रपट पाहतो. पण हा सिनेमा कोणत्याही समुदायावर बोट दाखवण्यासाठी बनवलेला नाही. मी पटकथा वाचताना एका कलाकाराच्या भूमिकेतून विचार केला. मात्र पहिल्यांदाच जाणवलं की माझ्या समुदायाशी संबंधित संवेदनशीलता अधिक जपणं आवश्यक आहे.”
‘हक’ चित्रपटाचं दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केलं आहे. यात इम्रान हाश्मी आणि यामी गौतमसोबत वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा आणि असीम हत्तांगडी यांच्या भूमिका आहेत. निर्माता विनीत जैन यांच्या पॅनोरमा स्टुडिओजद्वारे निर्मित हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
