Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. मालिकेच्या वाढत्या टीआरपीमुळे ती सध्या हिट ठरली आहे. मात्र, अलीकडेच तेजश्री मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोरात फिरू लागल्या.
या चर्चांना पूर्णविराम देत तेजश्रीने स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माध्यमांना थेट सुनावलं – “प्रिय मीडिया रिपोर्टर्स, मी मालिका सोडत नाहीये. आपल्या half knowledge मुळे views वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या छापू नका. ही झी मराठीशी असलेली वीण अजून तुटलेली नाही.”
याआधी तेजश्रीने तिच्या आगामी वेबसीरिजचं बिहाइंड-द-सीन व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओनंतरच या अफवांना उधाण आलं होतं. पण आता तिच्या या स्पष्ट पोस्टनंतर सगळे तर्क वितर्क थांबले आहेत.
चाहत्यांनी या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून, “तेजश्री, आम्ही तुमच्यासोबत आहोत” असं म्हणत पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, याआधी स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका तिने अर्धवट सोडली होती. त्यावेळीही कथानकातील बदलामुळे मतभेद असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, या वेळी तेजश्रीने स्वतः स्पष्ट भूमिका मांडली आहे आणि अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
