Kantara Chapter 1 Collection: ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजतोय. फक्त १० दिवसांत या चित्रपटानं तब्बल ३९७.६५ कोटी रुपये कमावले आहेत. पुढील काही दिवसांत सिनेमा ४०० कोटींचा टप्पा पार करेल, असं अंदाज व्यक्त केलं जातंय.
‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. सर्व भाषांमध्ये चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या शनिवारी कमाईत तब्बल ७० टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. कन्नडमध्ये ११.२५ कोटी, तेलुगूमध्ये ५.२५ कोटी, तमिळमध्ये ४.७५ कोटी, मल्याळममध्ये ३.२५ कोटी आणि हिंदीत १३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.
चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन स्वतः ऋषभ शेट्टीनं केलं आहे, तर निर्मिती होम्बळे फिल्म्सनं केली आहे. रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘कांतारा’ला सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांकडूनही मोठं कौतुक मिळत आहे. अनेक कलाकार, क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ऋषभ शेट्टीनं सांगितलं, “आमचं जग ‘कांतारा’च्या पहिल्या भागातून सुरू झालं. आम्ही निसर्ग आणि मानव यांच्यातील नातं शोधत आलो आहोत. ही कथा कर्नाटकच्या किनारपट्टीवरील लोककथांवर आधारित आहे.”
तो पुढे म्हणाला, “माझ्या मनात नेहमीच एक विचार होता — प्रादेशिक सिनेमेही जागतिक स्तरावर पोहोचू शकतात. या यशानं ते सिद्ध केलं आहे.”
येणाऱ्या आठवड्यांतही माऊथ पब्लिसिटीमुळे ‘कांतारा’कडे प्रेक्षकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, हा सिनेमा २०२५ मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरू शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
