गोविंदाने आता या चर्चांवर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला राणी स्वर्णकरसोबत जाण्यामागे आपल्या आगामी ‘रूपा’ चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्याचा उद्देश होता, असं त्याने स्पष्ट केलं आहे.
गोविंदाने ANIशी बोलताना सांगितलं की, याआधीही तो करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत मंदिरात गेला आहे. त्यावेळी आपल्या चित्रपटांना चांगलं यश मिळालं होतं, असं त्याने सांगितलं. बराच काळानंतर पुन्हा कामाला सुरुवात करत असल्याने ‘रूपा’साठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्याचं गोविंदाने म्हटलं.
मात्र, राणी स्वर्णकरसोबतच्या उपस्थितीमुळे सुरू झालेल्या चर्चांबाबत विचारण्यात आलं असता गोविंदाने वेगळाच दावा केला. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमागे ‘अत्यंत धोरणात्मक पद्धतीने आखलेला प्लॅन’ असल्याचं त्याने म्हटलं.
गोविंदाच्या म्हणण्यानुसार, या सगळ्यामागे त्याला कुटुंबापासून दूर करणं आणि समाजातील त्याची प्रतिमा खराब करणं हा उद्देश असल्याचं त्याला वाटतं. मात्र, आपण अशा चर्चांकडे लक्ष न देता कायम आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याचंही त्याने सांगितलं.
वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांवर गोविंदाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “हे कोणाच्याही चर्चेचा विषय नाही. अगदी अफेअर असलं तरीही ते कोणाच्याही चर्चेचा विषय नसावं. मी काम करत आहे आणि व्यावसायिक संबंध ठेवत आहे,” असं त्याने सांगितलं.
दरम्यान, गोविंदा आणि राणी स्वर्णकर आगामी ‘रूपा’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट गोविंदाच्या जवळपास 7 वर्षांनंतरच्या मोठ्या पडद्यावरील पुनरागमनाशी जोडला जात आहे. राणी स्वर्णकर या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे.
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गोविंदाच्या कुटुंबातील गणेशोत्सवाचाही उल्लेख होत आहे. अमेरिकेतून परतल्यानंतर गोविंदाने मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन यांच्यासोबत गणेश चतुर्थी साजरी केली होती. त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तो राणी स्वर्णकरसोबत दिसला.
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा हादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्याचा ‘Hero Ki Horrorine’ हा चित्रपट 7 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, सुनीता आहुजा, जेमी लीव्हर, चंकी पांडे, ब्रिजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांच्या भूमिका आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
