सई ताम्हणकरच्या आयुष्याभोवती फिरणार रहस्य; ‘बोल बोल राणी’ 17 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

Bol Bol Rani Movie: मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि सस्पेन्सवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार असून ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट 17 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पोस्टरमध्ये चारही कलाकार गंभीर आणि तणावपूर्ण अंदाजात दिसत असून त्यांच्या हातातील बंदुका आणि चेहऱ्यावरील भाव कथानकातील रहस्याची झलक देतात.

पोस्टर पाहिल्यानंतर प्रत्येक पात्रामागे एखादं गुपित दडलं असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या दिशेने जाणार आणि शेवटी कोणते रहस्य उलगडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

‘बोल बोल राणी’ हा एका महिलेच्या आयुष्याभोवती फिरणारा रहस्यप्रधान थ्रिलर आहे. नात्यांमधील विश्वास, फसवणूक, गूढ घटना आणि अनपेक्षित वळणांनी भरलेले कथानक प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर यांनी सांगितले की, नव्या पोस्टरमधून चित्रपटाच्या रहस्यमय विश्वाची केवळ झलक दाखवण्यात आली आहे. प्रत्येक पात्रामागे एक वेगळं गुपित दडलं असून त्याभोवती संपूर्ण कथा फिरते. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवेल, असा त्यांचा विश्वास आहे.

‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली हे निर्माते आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

‘बोल बोल राणी’ हा चित्रपट रहस्य, सस्पेन्स आणि थराराचा वेगळा अनुभव घेऊन 17 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दमदार कलाकार, गूढ वातावरण आणि वेगळ्या कथानकामुळे या चित्रपटाकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page