यावेळी दोन मराठी, दोन हिंदी आणि एक साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रत्येक चित्रपटाचा विषय वेगळा असल्यामुळे कोणत्या सिनेमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘अल्फा’ (Alpha) हा यशराज फिल्म्सचा बहुचर्चित स्पाय ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघीही दमदार ॲक्शन करताना दिसतील. विशेष म्हणजे हृतिक रोशनचीही या चित्रपटात खास भूमिका असल्याची चर्चा आहे.
‘बेबी डू डाय डू’ (Baby Do Die Do) हा क्राइम आणि ॲक्शनवर आधारित चित्रपट आहे. हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत असून, एका कर्णबधिर-मूक एनजीओ कार्यकर्तीची आणि तिच्या गुप्त आयुष्याची कथा यात दाखवण्यात आली आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी ‘मर्दिनी’ हा भावनिक चित्रपटही 3 जुलैला प्रदर्शित होणार आहे. मुलीच्या संरक्षणासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाणाऱ्या आईची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रार्थना बेहेरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ प्रमुख भूमिकेत आहेत.
त्याच दिवशी ‘आऊट ऑफ सिलेबस: पुस्तकांच्या पलीकडे’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष, स्वप्नं आणि वास्तव यांची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. यात अजिंक्य राऊत आणि अद्वयी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
याशिवाय ‘नागबंधम: द सीक्रेट ट्रेजर’ हा भव्य साऊथ चित्रपटही हिंदीसह प्रदर्शित होणार आहे. पौराणिक कथा, इतिहास आणि साहस यांचा संगम असलेल्या या चित्रपटात एका योद्ध्याचा रोमांचक प्रवास दाखवण्यात आला आहे.
एकाच दिवशी विविध विषयांवरील हे पाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट आघाडी घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
