समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये काही जण वर्तुळात उभे असल्याचे दिसते. मात्र, कोणाचाही चेहरा दाखवण्यात आलेला नाही. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे पेय असल्याने प्रत्येक पात्राचा वेगळा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात.
पोस्टरवरील “यावेळी तिसराच आहे!” ही टॅगलाईन आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणारे ‘सहलीला जायचं’ हे संगीत चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमध्ये दिसणारे हात नेमके कोणत्या कलाकारांचे आहेत, यावेळी सहलीला कोण सहभागी होणार आणि या टॅगलाईनमागील रहस्य काय आहे, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितले की, ‘झिम्मा ३’ हा केवळ पुढचा भाग नसून आधीपेक्षा अधिक मोठा, अधिक मनोरंजक आणि अधिक मजेदार अनुभव असेल. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, संपूर्ण टीम एका संस्मरणीय प्रवासासाठी सज्ज झाली आहे. पोस्टरमधून काही संकेत दिले असले तरी अजून अनेक मोठी सरप्राईज प्रेक्षकांसाठी राखून ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चित्रवलय/चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाची निर्मिती क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी केली आहे. 1 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, नव्या पोस्टरमुळे ‘झिम्मा ३’बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
