Tharala Tar Mag: अर्जुनला मिळाला सायलीच्या बालपणीचा पुरावा?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रचंड उत्कंठा वाढवणारे प्रसंग दाखवले जात आहेत. नवीन प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जुन आता सायलीच्या भूतकाळाचा शोध घेत थेट तिच्या शाळेपर्यंत पोहोचला आहे. मधुभाऊंनी कोमात जाण्यापूर्वी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचे आई-वडील जिवंत आहेत. हीच गोष्ट त्याला सतावत आहे. सायलीने मात्र “सुभेदार मंडळीच माझं कुटुंब” असं म्हणत अर्जुनला हा शोध थांबवण्याचा … Read more

रोहन कानवडे यांचा ‘साबर बोंडं’ मराठीत, आंतरराष्ट्रीय यशानंतर देशभरात प्रदर्शन

Marathi Entertainment News - Rang Marathi -

दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे यांचा ‘साबर बोंडं’ हा चित्रपट आता मराठी प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभर या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. या सिनेमाने यंदाच्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकून मोठं यश मिळवलं. या प्रकल्पाला मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील मोठ्या नावांचा पाठिंबा आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, … Read more

“मी ९९ टक्के निवृत्त होतोय” – नाना पाटेकर यांची स्पष्ट कबुली

Marathi Entertainment News - Rang Marathi -

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “मला आता निवृत्ती हवी आहे. मी नाटक, सिनेमातून ९९ टक्के निवृत्त होत आहे,” अशा भावूक शब्दांत त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतून जवळपास संन्यास घेतल्याची घोषणा केली. पुण्यात झालेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. आपल्या भावना व्यक्त करताना नाना म्हणाले, “मी १ जानेवारीला पंचाहत्तरी … Read more

सयाजी शिंदेसोबत रंगमंचावर झळकणार नेहा जोशी, ‘सखाराम बाईंडर’ची नवी मांडणी

Marathi Entertainment News - Rang Marathi -

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे. यात अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. नेहा म्हणाली की, “हे नाटक अर्धशतक जुनं असलं तरी त्याचा विषय आजही तितकाच लागू आहे. लक्ष्मीचं पात्र मला खूप भावलं. बाहेरून शांत दिसणारी पण आतून खंबीर अशी … Read more

विकेंडला फक्त 200 रुपयांत सिनेमा! कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

Marathi Entertainment News - Rang Marathi -

कर्नाटकमधील चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतीवर मोठा निर्णय घेतला आहे. आता विकेंडला सिनेमा पाहायला जाताना 500 किंवा 700 रुपये खर्च करावे लागणार नाहीत. कोणत्याही थिएटरमध्ये एक तिकीट जास्तीत जास्त 200 रुपयांत मिळणार आहे. शुक्रवारी कर्नाटक सरकारने कर्नाटक सिनेमा (नियंत्रण) नियम, 2014 मध्ये दुरुस्ती करून अधिसूचना जाहीर केली. त्यानुसार राज्यातील सर्व सिनेमा … Read more

‘दशावतार’ सिनेमातून दिलीप प्रभावळकरांचा गूढ अवतार; उद्यापासून महाराष्ट्रात धमाका

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी सिनेसृष्टीत उद्यापासून एक आगळावेगळा थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘दशावतार’ (Dashavatar Marathi Movie) हा चित्रपट १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असून, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची यातली अनोखी आणि गूढ भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. या चित्रपटाची कथा कोकणातील पारंपरिक लोककला, अध्यात्म आणि गूढतेशी घट्ट जोडलेली आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी लेखन, पटकथा आणि … Read more

‘लपंडाव’मध्ये रुपाली भोसलेचं सरकार, तर ‘नशिबवान’मध्ये नेहा नाईकची गिरीजा – 15 सप्टेंबरला प्रेक्षकांसाठी सरप्राईज

Marathi Entertainment News - Rang Marathi -

स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना लवकरच एकाच दिवशी दोन ताज्या मालिका पाहायला मिळणार आहेत. 15 सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ आणि ‘नशिबवान’ या दोन नवीन कथा घराघरात पोहोचतील. प्रोमोनेच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून दोन्ही मालिकांबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नशिबवान मालिकेत गिरीजा नावाच्या मुलीचं आयुष्य दाखवलं आहे. लहानपणापासून संकटं, जबाबदाऱ्या आणि संघर्ष यांनी वेढलेली गिरीजा आयुष्यात पुढे जाताना स्वत:ला खऱ्या … Read more

You cannot copy content of this page