इंजिनिअर ते अभिनेता; २५ वर्षीय सचिन चांदवडेंचं अचानक निधन

Sachin Chandwade Passed Away: मराठी मनोरंजन क्षेत्राला हादरवणारी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. अवघ्या २५ वर्षीय मराठी अभिनेता आणि इंजिनिअर असलेल्या सचिन चांदवडेंनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 23 ऑक्टोबरला पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे ही घटना घडली.

सचिन घराच्या वरच्या मजल्यावरल्या खोलीत होता. कुटुंबीयांना प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढे धुळे येथे हलवण्यात आलं, पण २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जळगावचा रहिवासी असलेला सचिन व्यावसायिकदृष्ट्या इंजिनिअर होता. पुण्यातील IT पार्कमध्ये नोकरी मिळाल्यानंतरही त्याने अभिनयाचं स्वप्न सोडले नाही. जमतारा 2 वेब सिरीजमधील भूमिकेमुळे तो चर्चेत आला होता. तसेच ‘असुरवन’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं.

सचिनच्या अचानक जाण्याने सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नेमकं आत्महत्येचं कारण अजून समोर आलेलं नसून पोलिस तपास सुरु आहे. नैराश्य, कामाचा ताण किंवा वैयक्तिक कारणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी कलाविश्वाने एक आशादायी तरुण कलाकार गमावला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page