मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच ‘बहार ए उर्दू’ या कार्यक्रमात त्यांनी उर्दू भाषेविषयी केलेलं विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.
सचिन म्हणाले, “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतूनच करतो. माझी पत्नी किंवा कोणीही रात्री तीन वाजता उठवलं, तरी मी उर्दूतच बोलतो. मी उर्दूतून जागा होतो आणि उर्दू भाषेसोबत झोपतोही. उर्दू माझी सवत आहे, आणि माझ्या पत्नीला ती आवडते.” त्यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सचिन यांचे उर्दूवरील प्रेम नवे नाही. त्यांनी अनेकदा सांगितले आहे की, प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांना उर्दू शिकवली होती. विविध कार्यक्रमांमधूनही त्यांनी या भाषेवरचं आपलं प्रभुत्व दाखवले आहे.
सचिन पिळगांवकर यांचा अभिनय प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं आणि या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘गीत गाता चल’, ‘शोले’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केलं.
हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत समान यश मिळवल्यानंतर सचिन यांनी वेबविश्वातही आपली छाप सोडली आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या मालिकेत त्यांच्या नकारात्मक भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
सचिन पिळगांवकरांचं उर्दूवरील प्रेम आणि भाषेविषयीची त्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू उघड करते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
