सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर योगिता चव्हाणचं वक्तव्य चर्चेत

Yogita Chavan:जीव माझा गुंतला’ मालिकेतून लोकांच्या घराघरात पोहचलेली योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही लोकप्रिय होती. पण आता या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं असून चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण योगिता आणि सौरभने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तसेच लग्नाचे सर्व फोटो डिलीट केल्याचंही समोर आलं आहे.

दोघांचं लग्न मार्च 2024 मध्ये अत्यंत गाजलं होतं. मालिका संपल्यानंतर प्रेमात असलेलं हे रिलेशन पुढे लग्नात रूपांतरित झालं. पण अवघ्या एका वर्षाच्या आत त्यांचं नातं तुटत असल्याच्या चर्चा आता वाढल्या आहेत.

न्यूज 18 लोकमतच्या अहवालानुसार, योगिता चव्हाणने यावर थेट उत्तर देणं टाळलं आहे. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नाही,” एवढंच म्हणत तिने या विषयावर मौन ठेवणं पसंत केलं. तर या प्रकरणी सौरभशी संपर्क साधता आला नाही.

योगिता चव्हाणने ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत ‘अंतरा’ ही प्रमुख भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही दिसली होती. योगिताचं मूळ गाव सातारा असलं तरी तिचा जन्म ठाण्यात झाला. तिने डान्समधून करिअरची सुरुवात करून पुढे अभिनयाकडे वळण घेतलं. तर सौरभ चौघुले हा मालवणमधला असून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन मुंबईत अभिनयाच्या ध्यासाने आला. सुरुवातीला त्याने मॉडेलिंग आणि नाटकातून ओळख निर्माण केली.

सध्या या दोघांच्या नात्याबद्दल काहीही अधिकृतपणे सांगितलेले नसले तरी सोशल मीडियावरील हालचालींमुळे चाहत्यांमध्ये प्रश्नच निर्माण झाले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page