Ajinkya Raut: ‘मन उडू उडू झालंय’ या चर्चित मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता अजिंक्य राऊत आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या सिनेमातून अजिंक्य प्रेक्षकांसमोर एका अत्यंत जबाबदारीच्या भूमिकेत दिसणार आहे.
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहचलेल्या अजिंक्यनं आतापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण शिवरायांची भूमिका मिळाल्यानंतर त्याने ही संधी आपल्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. “आपल्या आराध्य दैवताची भूमिका पडद्यावर साकारण्याचा मान मिळणं ही मोठी जबाबदारी आहे. पूर्ण टीमनं मला अप्रतिम साथ दिली,” असं अजिंक्यनं सांगितलं.
‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तुकारामांच्या अभंगावर आधारित या सिनेमात अध्यात्म आणि जीवनमूल्यांचा सखोल प्रवास दाखवला जाणार आहे. लेखन योगेश सोमण यांचं असून दिग्दर्शनाची सूत्रं दिग्पाल लांजेकर यांनी हाती घेतली आहेत. चित्रपटात छायांकनापासून संगीत, आर्ट डायरेक्शन, व्हीएफएक्सपासून प्रमोशनपर्यंत अनुभवी टीम काम करत आहे.
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत हा सिनेमा प्रेक्षकांसाठी भव्य दृश्यानुभव घेऊन येणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. सध्या अजिंक्य राऊतच्या या भूमिकेची पहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
