‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेच्या सेटवर जवळ आलेली ही जोडी 3 मार्च 2024 रोजी विवाहबंधनात अडकली होती. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या जोरात आहेत.
या चर्चेला उधाण येण्याचं कारण म्हणजे दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांचे लग्नातील आणि रोमँटिक फोटो डिलिट केल्याचं दिसत आहे. अलीकडेच दिवाळीच्या निमित्ताने सौरभने एकट्याचेच फोटो पोस्ट केले, तर योगिताच्याही अकाउंटवर फक्त तिचे वैयक्तिक फोटोच शिल्लक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचंही चाहत्यांच्या लक्षात आलं आहे.
बाली ट्रिपदरम्यान शेअर केलेले फोटोही आता दोघांच्या प्रोफाइलवरून गायब आहेत. तरीही ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या शूटिंगमधील काही जुने फोटो मात्र सोशल मीडियावर दिसतात. त्यामुळे घटस्फोट खरंच झाला आहे की फक्त वैयक्तिक कारणास्तव फोटो हटवले गेले आहेत, याबाबत अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही.
याआधीही मालिकेच्या सेटवरच प्रेम जुळून लग्न आणि त्यानंतर घटस्फोट अशी अनेक उदाहरणं आहेत. तेजश्री प्रधान-शशांक केतकर, पियूष रानडे-मयुरी वाघ, अली मर्चंट-सारा खान अशा अनेक जोडप्यांनी काही कारणास्तव आपापले मार्ग वेगळे केले होते.
योगिता आणि सौरभ यांच्याकडून अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र चाहत्यांमध्ये त्यांच्या वैवाहिक नात्याबद्दल मोठी चर्चा सुरु आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
