मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चा होत असलेला चित्रपट म्हणजे ‘गोंधळ’. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण या प्रमोशनच्या गर्दीत दिग्दर्शक संतोष डावखर यांनी अनपेक्षित पाउल उचललं आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर म्हटलं — “आमचा ट्रेलर बघू नका!”
त्यांचं म्हणणं आहे की या चित्रपटाची खरी ताकद म्हणजे कथा हळूहळू उलगडत जाण्याची शैली. त्यामुळे थ्रिल आणि भावना पूर्णपणे अनुभवायच्या असतील, तर चित्रपट थेट थिएटरमध्येच पाहावा. ट्रेलर आधी पाहिल्यास थोडा प्रभाव कमी होऊ शकतो, असा त्यांचा स्पष्ट इशारा.
आजच्या काळात जिथे ट्रेलर हे प्रमोशनचं सर्वात मोठं शस्त्र समजलं जातं, तिथे गोंधळच्या टीमने उलट दिशेने जात प्रेक्षकांचं कुतूहल आणखी वाढवलं आहे. डावखर म्हणतात, प्रत्येक पात्राचं रहस्य आणि भावविश्व थेट ७० एमएम पडद्यावर अनुभवावं. “ज्यांना शंका असेल त्यांनी ट्रेलर पाहावा, बाकी सर्वांनी थेट थिएटरमध्ये या,” असा त्यांचा आग्रह.
या चित्रपटात महाराष्ट्राची संस्कृती आणि लोकपरंपरेचा खरा गाभा दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मिती दीक्षा डावखर यांची आहे. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर आणि ऐश्वर्या शिंदे यांसारख्या अनेक दमदार कलाकारांची फौज यात झळकणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
