या नव्या पर्वात सहभागी होण्यासाठी इच्छुक गायकांनी आपला ऑडिशन व्हिडिओ 12 जुलै 2026 पर्यंत पाठवायचा आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 16 ते 30 वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ऑडिशनसाठी उमेदवारांनी आपला व्हिडिओ 79771 24313 किंवा 90821 93561 या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर पाठवायचा आहे. या संदर्भातील माहिती झी मराठीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्र पाहतोय तुमच्या सुरेल आवाजाची वाट… चला, पटापट ऑडिशन देऊन या! ‘सा रे ग म प’ लवकरच… आपल्या झी मराठीवर!” त्यामुळे इच्छुक गायकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यंदाच्या पर्वाबाबत आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे अवधूत गुप्ते. झी मराठीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा परीक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘सा रे ग म प मराठी’ हा मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो मानला जातो. या मंचातून अनेक गुणी गायकांना मोठी संधी मिळाली असून, रोहित राऊतसह अनेक कलाकारांनी याच कार्यक्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या कार्यक्रमाचा पहिला हंगाम 18 सप्टेंबर 2006 रोजी सुरू झाला होता. त्यानंतर या शोचे अनेक यशस्वी सीझन तसेच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चेही अनेक पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता नव्या पर्वातून आणखी काही नवोदित गायकांना आपल्या कलेची चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
