राकेश बापटने यापूर्वी ‘हिटलर’ या मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत अभिनेत्री सायली साळुंखे मुख्य भूमिकेत आहे. या दोघांची कथा नेमकी कशी पुढे जाणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
काय आहे ‘तुझ्याकडे तुला मागणे’ची कथा?
मालिकेच्या कथेनुसार, राकेश बापटची व्यक्तिरेखा आपल्या मुलासाठी आई शोधत आहे. दुसरीकडे, सायली साळुंखेच्या आईला आपल्या राजकीय फायद्याचा विचार करून मुलीसाठी मुलगा शोधायचा आहे. या दोघांच्या अपेक्षा आणि परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे मालिकेत पाहायला मिळेल.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे मालिकेतील इतर पात्रांचीही माहिती समोर आली आहे. अभिनेत्री सुप्रिया पाठारे सायलीच्या आईची भूमिका साकारणार असून, तिची व्यक्तिरेखा नकारात्मक आहे. अभिनेत्री समिधा गुरु राकेश बापटच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
२६ ऑक्टोबरपासून मालिका; रात्री ८ वाजता प्रसारण
‘तुझ्याकडे तुला मागणे’ ही मालिका २६ ऑक्टोबरपासून रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. या मालिकेला प्राइम टाइम स्लॉट देण्यात आला आहे.
सध्या रात्री ८ वाजता ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रसारित होते. नव्या मालिकेसाठी तिची वेळ बदलण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांत या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत दोनदा बदल झाला होता. आता पुन्हा वेळ बदलणार असल्याने काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नव्या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या प्राइम टाइममधील वेळापत्रकात बदल होणार आहे. त्यामुळे ‘तुझ्याकडे तुला मागणे’च्या कथेला प्रेक्षकांची किती पसंती मिळते आणि ‘तू ही रे माझा मितवा’ची नवी वेळ कोणती असेल, याकडे आता मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
