ऑगस्टमध्ये येतंय ‘काटकोन त्रिकोण’ नाटक; नातेसंबंध आणि रहस्याची अनोखी गुंफण

Katkon Trikon Natak: मराठी रंगभूमीवर आणखी एका वेगळ्या विषयावरील नाटकाची भर पडणार आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नवं कौटुंबिक थ्रिलर नाटक ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

“बुद्धी आणि भावना यांना स्पर्श करणारं नाटक!” या घोषवाक्यासह सादर करण्यात आलेल्या पोस्टरमुळे कथानकाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नाटकात एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनेनंतर बदलणारी नाती, दडलेली सत्यं आणि भावनिक संघर्ष दाखवण्यात येणार आहेत.

या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील विविध पैलू आणि गुंतागुंतीच्या भावना प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.

नाटकाचे दिग्दर्शक अजित भुरे यांच्या मते, ‘काटकोन त्रिकोण’ हे केवळ रहस्यप्रधान नाटक नाही, तर प्रत्येक कुटुंबात दडलेल्या न बोललेल्या प्रश्नांचा आणि बदलत्या नात्यांचा वेध घेणारं कथानक आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतानाच हे नाटक स्वतःच्या नातेसंबंधांकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडेल, असा त्यांचा विश्वास आहे.

या नाटकाचं लेखन विवेक बेळे यांनी केलं असून दिग्दर्शन अजित भुरे यांचं आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, प्रकाशयोजना शीतल तळपदे आणि संगीत साई पियुष यांनी सांभाळलं आहे. नितीन नाईक हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.

चौरंगी एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्ट महिन्यात रंगभूमीवर दाखल होणार असून, त्याची प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page