लग्न एकाचं, प्रेम दुसरीचं? भाऊ कदमच्या नव्या नाटकाची भन्नाट कथा चर्चेत

Bhau Kadam New Natak: आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवणारे अभिनेते भाऊ कदम पुन्हा एकदा रंगभूमीवर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नव्या मराठी नाटकात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेम, लग्न आणि नात्यांमधील गमतीदार प्रसंग या नाटकातून पाहायला मिळणार आहेत.

‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक स्वप्नील बारसकर यांनी लिहिलं आहे. संतोष पवार यांनी दिग्दर्शन केलं असून, डॉ. उमेश आजगांवकर आणि सचिन सुभाष अवस्थी यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

नाटकात भाऊ कदम यांच्यासोबत मैथिली वारंग, सुजाता किरण, पुनम सरोदे परब आणि साकार देसाई हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. साई पियुष यांनी नाटकाला संगीत दिलं आहे.

नाटकाची कथा प्रेम, लग्न आणि नात्यांभोवती फिरते. या विषयांकडे विनोदी पद्धतीने पाहताना नात्यांमधील भावनिक बाजूही प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. भाऊ कदम यांच्या अभिनयामुळे नाटकातील विनोदी प्रसंगांना आणखी रंगत येण्याची अपेक्षा आहे.

नाटकाबद्दल बोलताना भाऊ कदम यांनी कथानक आणि संकल्पना गमतीदार असल्याचं सांगितलं. नाटकातील प्रसंग प्रेक्षकांना नक्की हसवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कलाकारांची टीमही उत्तम असून, प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर रंगमंचावर काम करण्याचा अनुभव नेहमीच वेगळा असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा शुभारंभाचा प्रयोग 29 ऑगस्टला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी 12.30 वाजता होणार आहे. नवनीत प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी भाऊ कदम यांचे चाहते आणि मराठी नाट्यरसिक उत्सुक आहेत.

प्रेम आणि लग्नाच्या नात्यांमधून निर्माण होणारा गोंधळ, विनोदी प्रसंग आणि भाऊ कदम यांचा खास अंदाज यामुळे हे नाटक प्रेक्षकांचं कितपत मनोरंजन करतं, हे प्रयोगानंतर स्पष्ट होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page