‘डिंक्स’ म्हणजे नेमकं काय? प्राजक्ता माळीच्या नव्या सिनेमाची शूटिंग सुरू

Dinks Movie Marathi: बदलत्या काळासोबत लग्न, करिअर आणि नात्यांकडे पाहण्याची पद्धतही बदलत आहे. याच बदलत्या समीकरणांवर भाष्य करणाऱ्या ‘डिंक्स’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अजय मोंगा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून जितेंद्र राय आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी एका नव्या लूकमध्ये आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या मुहूर्तावेळी समोर आलेल्या तिच्या लूकनेही लक्ष वेधून घेतलं आहे.

पिंक ब्लेझर, ब्लॅक शर्ट आणि शॉर्ट हेयर अशा लूकमध्ये प्राजक्ता दिसत आहे. त्यामुळे तिची व्यक्तिरेखा नेमकी कशी असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील अंदाज वेगळा असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘DINKS’ म्हणजे ‘Double Income, No Kids’. या संकल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरते. आजच्या तरुण जोडपांची जीवनशैली, मुलांबाबतचे निर्णय, करिअरच्या आकांक्षा, नात्यांमधील अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे भावनिक प्रश्न यांचा कथेतून वेध घेतला जाणार आहे.

दिग्दर्शक अजय मोंगा यांच्या मते, ‘डिंक्स’ हा केवळ एका नात्याची कथा नसून आजच्या पिढीच्या बदलत्या विचारसरणीचं प्रतिबिंब आहे. प्राजक्ताचा लूक तिच्या व्यक्तिरेखेची झलक देतो. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभवही खास असल्याचं त्यांनी सांगितलं.

निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांच्या मते, हा विषय आजच्या पिढीशी थेट जोडलेला आहे. स्वतःच्या आयुष्यातील काही प्रश्न या कथेत दिसू शकतील, अशा पद्धतीने चित्रपट मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सायलेंट कॅनवास फिल्म्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. ‘डिंक्स’ची संकल्पना आजच्या नात्यांमधील बदल किती वेगळ्या पद्धतीने दाखवते, प्राजक्ता माळीची भूमिका नेमकी काय आहे आणि तिच्यासोबत कोणते कलाकार दिसणार आहेत, याबाबतची माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे.

चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता प्रेक्षकांचं लक्ष चित्रपटाच्या पुढील अपडेट्सकडे लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page