सलमान खानने ‘बिग बॉस 20’च्या नव्या प्रोमोमध्ये या खास ट्विस्टची घोषणा केली आहे. ‘फॅन्स का फैसला’ या संकल्पनेतून प्रेक्षकांना दोन संभाव्य स्पर्धकांपैकी आपल्या आवडत्या व्यक्तीला निवडण्याची संधी देण्यात आली आहे. ज्याला सर्वाधिक मतं मिळतील, त्याला ‘Extra Jeevan Daan’ मिळणार असून तो किंवा ती थेट बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.
रिया अहीर गेल्या महिन्यात CJPच्या NEET-UG 2026 पेपर लीकविरोधी आंदोलनामुळे अचानक चर्चेत आली. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनादरम्यान तिने आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनसमोर उभं राहत ती गाडी पुढे जाऊ दिली नव्हती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि रियाला देशभरात ओळख मिळाली.
या घटनेनंतर रिया अहीरला सोशल मीडियावर कौतुकासोबतच टीकेचाही सामना करावा लागला. ऑनलाइन गैरवर्तन आणि आक्षेपार्ह पोस्टविरोधात तिने पोलिसांकडे तक्रारही केली होती.
आता तिच्या या लोकप्रियतेचा परिणाम ‘बिग बॉस 20’च्या एन्ट्रीमध्येही दिसत आहे. मात्र, रियाची निवड अंतिम झालेली नाही. रिया अहीर विरुद्ध लव्ह गिल असा हा सामना असून प्रेक्षकांच्या मतदानाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. अंतिम विजेत्याची घोषणा 6 सप्टेंबरच्या ग्रँड प्रीमियरमध्ये होणार आहे.
रिया अहीर ही मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिच्या मॉडेलिंग, अभिनय आणि सोशल मीडिया उपस्थितीमुळे ती आधीपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. CJP आंदोलनातील घटनेनंतर तिच्या नावाची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात वाढली.
दुसरीकडे लव्ह गिल ही पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री असून टीव्ही तसेच पंजाबी मनोरंजन क्षेत्रात तिने काम केलं आहे. त्यामुळे दोन्ही स्पर्धकांची पार्श्वभूमी वेगळी असून, आता प्रेक्षक कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. सलमान खान पुन्हा एकदा या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.
रिया अहीर आणि लव्ह गिल यांच्यापैकी कोणाला प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळतो आणि ‘Extra Jeevan Daan’ घेऊन बिग बॉसच्या घरात कोण प्रवेश करतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
