चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 14 कोटी रुपयांची कमाई करत शानदार सुरुवात केली. त्यानंतर वीकेंडमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी झाल्याने तीन दिवसांतच तब्बल 51 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश मिळालं.
सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा कमी झाला. मात्र, सॅकनिल्कच्या अहवालानुसार सातव्या दिवशीही चित्रपटाने 6 कोटी रुपये कमावले. त्यामुळे पहिल्या सात दिवसांत भारतातील एकूण कमाई 96 कोटी रुपये इतकी झाली आहे.
देशांतर्गत कमाईसोबतच परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगभरात 132 कोटी रुपये कमावत ‘धमाल ४’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
‘टोटल धमाल’नंतर आलेल्या या नव्या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनोदाचा जबरदस्त डोस मिळत आहे. चित्रपटात अजय देवगण ‘गुड्डू’, तर रितेश देशमुख ‘लल्लन’च्या भूमिकेत दिसत आहे.
याशिवाय अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांची ‘आदि’ आणि ‘मानव’ ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यांच्यासोबत रवी किशन, संजय मिश्रा, अंजली आनंद, संजीदा शेख, विजय पाटकर आणि उपेंद्र लिमये यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
