नव्या मालिकेला रात्री १० चा स्लॉट मिळाला आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटलं होतं की या जागेसाठी ‘देवमाणूस’ ही मालिका संपणार आहे.
पण असं झालं नाही.
वाहिनीने ‘देवमाणूस’ची वेळच बदलली आहे. किरण गायकवाड यांची ही मालिका आता येत्या सोमवारपासून रात्री १०:३० वाजता प्रसारित होणार आहे. म्हणजे ती बंद होत नाही, फक्त तिला नवा वेळ मिळाला आहे.
आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते ‘तुला जपणार आहे’ या मालिकेकडे. साडेदहा वाजता प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशा चर्चा आहेत.
अद्याप याची अधिकृत माहिती नाही. या टीमकडून किंवा झी मराठीकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.
मात्र, या मालिकेच्या नायिकेने शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतली आहे. ‘तुला जपणार आहे’मधली मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे यांनी सेटवरून एक सेल्फी शेअर केला आहे.
या फोटोसोबत त्यांनी “आज काहीतरी वेगळं वाटतंय” असं कॅप्शन दिलंय. त्यानंतर हार्ट इमोजी आणि डोळ्यात पाणी आल्याचा इमोजीही जोडला आहे.
हा फोटो शूटच्या शेवटच्या दिवसाचा असावा, म्हणूनच महिमाने असं भावनिक कॅप्शन दिलं असं बोललं जातंय.
असे असेल तर या मालिकेचा शेवटचा भाग २७ नोव्हेंबरला प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे.
पण ही सगळी चर्चा आहे. मालिका संपणार आहे की नाही, याचा उलगडा लवकरच होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
