Bajrangi Marathi Movie: सिद्धार्थ जाधव दिसणार ‘बजरंगी’च्या भूमिकेत; पोस्टरने वेधलं लक्ष

Bajrangi Marathi Movie: आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चं दमदार पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. भव्य हनुमंताची मूर्ती, भगवे ध्वज, किल्ल्याची पार्श्वभूमी आणि मूर्तीकडे पाठ करून उभा असलेला तरुण यामुळे या चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती ठळकपणे पाहायला मिळते. तिच्यासमोर हातात भगवा कपडा घेऊन एक तरुण उभा आहे. दुसऱ्या बाजूला किल्ला, आजूबाजूला फडकणारे भगवे ध्वज आणि आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश अशी दृश्यरचना करण्यात आली आहे.

या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेला गूढ आणि रहस्यमय पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळतात. मात्र निर्मात्यांनी कथेचा फारसा उलगडा केलेला नाही. त्यामुळे पोस्टर पाहिल्यानंतर या तरुणाचा हनुमंताशी नेमका काय संबंध आहे, त्याच्या आयुष्यात कोणती घटना घडते आणि पुढे कथेत काय वळण येतं, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘बजरंगी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेतून तो प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या अंदाजात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटाच्या कथेत त्याची व्यक्तिरेखा नेमकी काय भूमिका बजावते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘बजरंगी’चं दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केलं असून, लेखन हेमंत एदलाबादकर यांचं आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

दिग्दर्शक तेजस लोखंडे यांनी चित्रपटाच्या कथेवर भाष्य करताना सांगितलं की, ‘बजरंगी’ची कथा अशा एका प्रसंगापासून सुरू होते, जो स्वतःमध्येच अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या प्रवासात त्याच्या आयुष्यात काही अनपेक्षित घटना घडणार आहेत. पोस्टरमधून कथेचा फारसा उलगडा न करता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हनुमंताची भव्य मूर्ती आणि त्यासमोर उभ्या असलेल्या या तरुणामागची संपूर्ण कथा चित्रपटातूनच समोर येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page